लोकसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार फिक्स? फक्त घोषणा बाकी, कुणाची नावं निश्चित?

| Updated on: Mar 25, 2024 | 5:06 PM

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिणमध्य येथून अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तिकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित करण्यात आलीये..तर कल्याण, पालघर येथून अंतिम शिक्कामोर्तब नाही...अजून कोणाचे नाव निश्चित झाले बघा.....

आगामी लोकसभा निवडणुकीकरता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ठरल्याचे समोर आले आहे. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिणमध्य येथून अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तिकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. तर उत्तर मुंबईमधून विनोद घोसाळकर यांचं नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत, रायगडमधून अनंत गिते आणि छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यासह यवतमाळ-वाशिममधून संजय देशमुख, जळगाव येथून ललीता पाटील यांचं नाव संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. बुलढाणा, नरेंद्र खेडेकर, हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर, परभणीमधून संजय जाधव, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे, नाशिक येथून विजय करंजकर. ठाणे- राजन विचारे तर कल्याण, पालघर येथून अंतिम शिक्कामोर्तब नाही…अजून कोणाचे नाव निश्चित झाले बघा…..

Published on: Mar 25, 2024 05:06 PM
राज ठाकरेंच्या हाती शिवसेनेची कमान? राज ठाकरेंच्या नेतृत्वाला शिंदे गटातून जोरदार विरोध, शहाजीबापू म्हणाले…
आता तरी सुधारा, राहुल शेवाळेंचा संजय राऊतांना खोचक टोला