चुकीला माफी नाही, शिवद्रोह्यांना ‘गेट ऑऊट ऑफ इंडिया’ करु; ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा

| Updated on: Sep 01, 2024 | 12:53 PM

मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकासआघाडीचा मोर्चा काढण्यात आला. महाविकासआघाडी या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह अनेक दिग्गज नेते या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया परिसरात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ८ महिन्यांत कोसळल्याच्या घटनेनंतर महायुतीचा निषेध करण्यासाठी मविआ नेते रस्त्यावर उतरले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका करत थेट इशारा दिला. ‘महाराष्ट्रात जे वातावरण चाललं आहे. त्याला मी राजकारण म्हणायला तयार नाही. पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला. शिवद्रोही मंडळी तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरले. तुम्ही राजकारण करत आहेत असा आरोप आहे. मी म्हणेल ते करतात ते राजकारण नाही. गजकरण आहे.खाजवत बसत आहे. खाजवू द्या त्यांना. चुकीला माफी नाही.’, असे म्हणत उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले तर आपल्या देशाचं प्रवेशद्वार.. इथे शिवद्रोही सरकार आहे. घटनाबाह्य सरकार आहे. त्यांना सांगूया गेट आऊट ऑफ इंडिया. गेट आऊट. म्हणूनच इथे बसलो आहोत. देशाचे पंतप्रधान आले. त्यांनी माफी मागितली. माफी मागितली नसती तर तुम्हीला महारााष्ट्राने ठेवलं नसतं. माफी मागताना त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. ही मग्रुरी मान्य आहे का. माफी मागताना मग्रुरी कसली? असा आक्रमक सवालही उद्धव ठाकरेंनी केला.

Published on: Sep 01, 2024 12:53 PM
‘किस गली में खस-खस है, आग लग गई तो धुव्वा उडणे वाला है; बच्चू कडू यांचा रोख कोणावर?
सत्ता आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले, राजन विचारे यांचा आरोप