त्यांच्या सुरक्षेत रॉकेट, लाँचर आणि रणगाडे…, पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंचा हल्लाबोल
राज्य सरकारने अजित पवार यांच्या मुलाला पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय. घरात काम करणाऱ्यांना या सरकारने झेड प्लस, वाय प्लस सुरक्षा दिली आहे. सर्व सामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर...
सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेताना दिसताय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अजित पवार यांच्या मुलाला पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय. घरात काम करणाऱ्यांना या सरकारने झेड प्लस, वाय प्लस सुरक्षा दिली आहे. सर्व सामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे. महिला सुरक्षित नाहीत. सलमानच्या घरावर गोळीबार होतोय. त्यांचंच पक्षात कुणी ऐकत नाही म्हणून उद्विगतेने त्यांचा आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहे. सर्वसामान्य लोकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. पण गद्दारांना कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहेत. सुरक्षेचा खर्च कोण करतंय हा प्रश्न आहे, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय तर लोकांचा कर घेऊन गद्दारांना सुरक्षा दिली जात आहे, असे म्हणत टोलाही लगावला.