बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. अशातच उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलीत
देशासह राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. अशातच उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप, नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. महाराष्ट्रात उद्योगधंदे येऊच नयेत याचे मनसुबे रचायचे. महाराष्ट्र हा भारताचा आधार आहे आणि तोच आधारच लुळापांगळा करायचा, त्याच्या डोक्यावरती आपण बसायचं, असं म्हणत नाव न घेता ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधलाय. तर आपलं सरकार पाडून पहिला निर्णय केंद्र पाडून टाकून ती जागा ताबडतोब बुलेट ट्रेनच्या घशात घातली. आता बुलेट ट्रेनचा उपयोग मराठी माणसाला काय होणार आहे? मराठी माणसाविषयी आकस आहे. बुलेट ट्रेनचा फायदा गुजरातलाच होणार. गुजरातबद्दल माझ्या मनात आकस नाही. परंतु मोदी हे गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये भिंत उभी करताहेत आणि हा महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे की मुंबईला भिकेला लावायचं असं म्हणत ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केला.