उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ३२ समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे ३२ समन्वयक विभागवार असणार असून ७ मुख्य समन्वयकांची नियुक्ती देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यासह आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. २४ स्टार प्रचारकांची नाव जाहीर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई, विनायक राऊत, आदेश बांदेकर, अंबादास दानवे, नितीन बानगुडे पाटील, प्रियांका चतुर्वेदी, सचिन आहिर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर यांची नावं आहे. तर याबरोबर ज्योती ठाकरे, संजना घाडी, जान्हवी सावंत, शरद कोळी, ओमराजे निंबाळकर, आनंद दुबे, किरण माने, प्रियांका जोशी, लक्ष्मण वडले यांचा देखील समावेश करण्यात आलाय.