खोके देणाऱ्या अन् घेणाऱ्यांना स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो, शिंदे गटावर काय डागलं टीकास्त्र?

| Updated on: Jan 07, 2024 | 3:42 PM

तुमच्या भावना फार महत्त्वाच्या शब्दात मांडल्या त्यामुळे आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय. पण काही जणं भटकंतीला गेलेत पण त्यांना परत घरात घेणार नाही. कारण ते खोक्यात बंद झाले आहेत. त्यांना खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील नेत्यांना लगावला

मुंबई, ७ जानेवारी २०२४ : अभिनेता किरण माने यांच्यासह बीडमधील काही कार्यकर्त्यांना आज ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधून त्यांचं ठाकरे गटात स्वागत केलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्या भावना फार महत्त्वाच्या शब्दात मांडल्या त्यामुळे आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय. पण काही जणं भटकंतीला गेलेत पण त्यांना परत घरात घेणार नाही. कारण ते खोक्यात बंद झाले आहेत. त्यांना खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील नेत्यांना लगावला. पुढे ते असेही म्हणाले की, शिवसेनेसारखं प्रेम कुठल्याही पक्षात मिळत नाही. म्हणूनच घरात आल्यासारखं वाटतं. शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा एक संवाद आहे. आज मेरे पास ये है, वो है… तुम्हारे पास क्या है? तुम्हाला सांगतो, आपल्याकडे शिवसैनिकांची माया, प्रेम, हिंमत आणि जिद्द आहे. ते विकली जात नाही, विकत घेता येत नाही. लढाई मोठी आहे. तुमच्या सारखे कट्टर एकवटले तर लढाई सोपी आहे. तुमच्या सारखे लोक आले तर डगमगता येत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. खोके देणारे आणि घेणाऱ्यांनी पक्ष चिन्ह घेतलं तरीही त्यांना स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो. कारण उद्धव ठाकरे एकटा नाही. उद्धव ठाकरेंसोबत महाराष्ट्र आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.

Published on: Jan 07, 2024 03:42 PM
… ही राजकीय भूकंपाची सुरूवात, संजय राऊत यांनी काय केलं आमदार अपात्रतेच्या निकालावर सूचक वक्तव्य?
आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी ‘वर्षा’वर खलबतं? राहुल नार्वेकर अन् मुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक