उद्धव ठाकरे यांनी मानले भावजयचे आभार, म्हणाले…
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. तर या प्रकरणावर प्रश्न विचारला असता शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले होते. तर आता उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत शर्मिला ठाकरे यांचे अभार मानले आहेत.
नागपूर, १८ डिसेंबर २०२३ : आदित्य ठाकरे यांच्या बाजूने बोलल्या बद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहे. ‘ आदित्यच्या बाजूने बोलल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. तर या प्रकरणावर प्रश्न विचारला असता शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले होते. ‘मला असं वाटत नाही आदित्य असं काही करेल….चौकश्या तर कोणीही लावेल, आम्ही पण यातून गेलोय’ असं थेट भाष्य त्यांनी केलं होतं. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत शर्मिला ठाकरे यांचे अभार मानले आहेत. तर आरोप समोरून झाल्याने दुरान्वयाने संबंध नसतानाही लगेच चौकशी लावता. मग आम्ही जे काही पुरावे मांडतो त्याची दखल घेऊन चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.