‘आवाज कुणाचा…’ बघा उद्धव ठाकरे यांची पूर्ण रोखठोक अन् स्फोटक मुलाखत, कुणावर सोडलं टीकास्त्र
VIDEO | उद्धव ठाकरे यांची ‘सामना’साठी मुलाखत, संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांची रोखठोक भूमिका
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’साठी ही मुलाखत घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडल्याचे पाहायला मिळाले. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राज्य सरकारपासून केंद्र सरकारपर्यंत टीकास्त्र सोडले. तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादीमध्येही फूट पडली. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट सवाल कर त्यांना कोंडीत देखील पकडल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी आवाज कुणाचा या पॉडकास्टच्या माध्यमातून ही मुलाखत दैनिक सामना या वृत्तपत्राला दिली. तर यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. चोर वाटेने किंवा चोरून मारून सीएम करण्याची वेळ आली नसती. फॉर्म्युल्याप्रमाणे वागला असतात तर उपद्व्याप करावे लागले नसते, असे सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.