Uddhav Thackeray | आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही, बघा उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण
"आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही. शिवसेनेचा जन्म न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झाला आहे", अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गरजले (Uddhav Thackeray uncut speech on shivsena 55th anniversary).
मुंबई : “आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही. शिवसेनेचा जन्म न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झाला आहे”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गरजले. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे राज्यभरातील शिवसैनिकांशी संवाद साधला. या ऑनलाईन कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर रोखठोकपणे भूमिका मांडली. राज्यातील आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस नेते स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत. याशिवाय भाजपही महाविकास आघाडी आणि शिवेसेनेवर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली (Uddhav Thackeray uncut speech on shivsena 55th anniversary).
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही. शिवसेनेचा जन्म न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झाला आहे. आम्ही भलत्यासलत्याच्या पालख्यांना खांदा देणार नाही. त्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही. पायात फाटके जोडे घालू, पण आम्ही आमच्याच पायांवर खंबीरपणे उभे राहू”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.