उद्धव ठाकरेंवर मुंबईत अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांनी काय दिला सल्ला?
उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये सुद्धा अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले होते. दरम्यान, आज उद्धव ठाकरे स्वत:चं मेडीकल रुटीन चेकअप करण्यासाठी मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांचे रुटीन चेकअप केले. त्यावेळेस त्यांच्या रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची मोठी माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात अॅन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. सकाळी आठ वाजता उद्धव ठाकरे स्वत:चं मेडीकल रुटीन चेकअप करण्यासाठी मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची रुटीन चेकअप केली त्यावेळेस त्यांच्या रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. यानंतर डॉक्टरांनी उद्धव ठाकरेंना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. “आज सकाळी, उद्धव ठाकरे एचएन रिलायन्स रुग्णालयात पूर्व नियोजित तपासणीसाठी दाखल झालेत. तुमच्या शुभेच्छासह सर्व काही ठीक आहे, पुन्हा कार्यरत होण्यासाठी आणि तुमच्यासेवेसाठी पूर्णपणे तयार आहेत”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.