CM Uddhav Thackeray LIVE | सहकार्याचा मार्ग नॅरोगेज न राहता ब्रॉडगेज व्हावा, ठाकरेंचं गडकरींना आवाहन

| Updated on: Jul 31, 2021 | 1:55 PM

नागपूरातील कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपुलाचं भुमीपुजन आज पार पडलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हे भुमीपुजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीडीओ लिंकद्वारे हजर होते.

नागपूरातील कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपुलाचं भुमीपुजन आज पार पडलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हे भुमीपुजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीडीओ लिंकद्वारे हजर होते. कडबी चौक ते गोळीबार चौक 4.82 किमीचा नविन उड्डाणपुल तयार करण्यात येणार असून, या प्रकल्पाची किंमत 146 कोटी रुपये इतकी आहे. नागपूर ते नागभीड रेल्वेवरील चार नविन उडाणपुलाचं भुमिपुजन होणार आहे. यावेळी, ‘रस्ते खचतायत, गडकरी साहेब राज्याला आपली मदत लागणार आहे. गडकरींकडच्या तंत्रज्ञानाची राज्याला गरज आहे. भविष्यात पर्यावरणाचं हित सांभाळात काम करायचं आहे. कितीही पाऊस पडला तरीही  बाधा येणार नाही, असं काम भविष्यात आपल्याला करायचं आहे,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसचं, आपत्ती निवारताना आता मोठा खर्च येतोय, त्यामुळे आता जे काही करायचे ते मजबूत करायचं. सहकार्याचा रस्ता नॅरोगेज न राहता ब्रॅाडगेज असावा, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 31 July 2021
Ganpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुखांच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर