उद्धव ठाकरे यांचं नारायण राणे यांना आव्हान, ‘आंडूपाडूंनी आव्हानाच्या पिचक्या बेडक्या फुगवल्यात पण…’,
VIDEO | दिल्लीचे दडपशाही 'जंतर मंतर' बारसू सोलगावातही अवतरले, सामना अग्रलेखातून राज्य सरकावर निशाणा
मुंबई : उद्धव ठाकरे आज रत्नागिरीतील बारसू येथे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बारसूच्या स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत. त्यानंतर बारसू-सोलगाव येथे उद्धव ठाकरे सभा देखील घेणार आहेत. दरम्यान या दौऱ्यापूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांना आव्हानच दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बारसूत येऊनच दाखवावं. आम्हीही रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चे काढू, असं नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल्यानंतर ठाकरे गटानेही राणेंना सामनाच्या अग्रलेखातून जोरदार फटकारले आहे. कोकणातील काही आंडूपाडूंनी आव्हानाच्या पिचक्या बेडक्या फुगवल्या आहेत. पण आम्ही बारसूत जाणारच आहोत, असे ठाकरे गटाने खडसावले. दडपशाही या शब्दावर सरकारचं विशेष प्रेम दिसतंय. दिल्लीच्या जंतरमंतरवर ऑलिम्पिक विजेत्या महिला खेळाडू आंदोलनास बसल्या आहेत. त्या ठिकाणी पोालिसांनी बळाचाव वापर सुरू केला आहे. आंदोलन उखडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. रत्नागिरीतील बारसू-सोलगावातही दडपशाहीचे तेच जंतरमंतर सुरू असून काटक कोकणी माणूस हटायला तयार नाही, असं म्हणत ‘सामना’च्या अग्रलेखातून थेट नारायण राणे यांनाच आव्हान देण्यात आलं आहे.