राज ठाकरेंचं १७ वर्षांनंतर ‘धनुष्यबाणा’ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच ‘पंजा’ला मत, मुख्यमंत्र्याचा निशाणा काय?

| Updated on: May 21, 2024 | 12:44 PM

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला मत दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेब साहेब ठाकरे यांचे वारस सांगणाऱ्यांनी अभिमानाने काँग्रेसला मतदान केल्याचं शिंदे म्हणाले. इतकंच नाहीतर हा शिवसेनेसाठी काळा दिवस असल्याचेही त्यांनी म्हणत ठाकरेंवर सडकून टीका केली

Follow us on

महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणामुळे ठाकरे बंधूंसाठी लोकसभेची यंदाची निवडणूक ही वेगळी ठरली. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये आहेत तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केलं तर राज ठाकरे यांनी जवळपास १७ वर्षांनंतर धनुष्यबाणाचं बटण दाबून शिवेसेनाला आपलं मत दिलं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला मत दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेब साहेब ठाकरे यांचे वारस सांगणाऱ्यांनी अभिमानाने काँग्रेसला मतदान केल्याचं शिंदे म्हणाले. इतकंच नाहीतर हा शिवसेनेसाठी काळा दिवस असल्याचेही त्यांनी म्हणत ठाकरेंवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी बांद्र्यातील नवजीवन विद्यालयात आपलं मतदान केलं. उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी मतदान केलं. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसकडून वर्षा गायकवाड तर वकील उज्ज्वल निकम यांच्यात सामना आहे. दरम्यान, ठाकरेंनी पत्रकार परिषदेतच वर्षा गायकवाड यांचा मतदार असल्याचे जाहीर केलं होतं. त्यानुसार ठाकरेंनी पंजाचं यंदा बटण दाबलंय.