Video : ‘उद्धव ठाकरेच कंत्राटी मुख्यमंत्री’ नारायण राणेंचा शिवसेना पक्षप्रमुखांवर निशाणा, आदित्य ठाकरेंनाही डिवचलं

| Updated on: Aug 31, 2022 | 5:52 PM

Narayan Rane on Uddhav Thackeray : आता आपण गप्प बसावे, रिटायरमेन्ट मिळालेली आहे, आता घरी बसा, अशा शब्दांत नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांना सुनावलंय. स्वतःच्या कर्तृत्वावर संरपंच होण्याची सुद्ध तुमची लायकी नाही, असंही ते म्हणालेत.

मुंबई : नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा उल्लेख करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर त्याच शब्दांत नारायण राणे यांनी उत्तर दिलंय. एकनाथ शिंदे हे कंत्राटी मुख्यमंत्री नसून परमनंट मुख्यमंत्री आहेत आणि शिंदे-फडणवीस सरकारही परमनंट आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं. गणपती बाप्पाने कंत्राटी सरकार आधीच घालवून लावलं, अशा शब्दांत नारायण राणे यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत अशाप्रकारे अपमानित होऊन कुणालाही मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलेलं नव्हतं, असंही ते म्हणालेत. उद्धव ठाकरे हे फक्त् तीन तास मंत्रालयात गेले. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला त्यांनी काय दिलं, असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. आता तुम्हाला बोलणाचा, टीका करण्याचा अधिकार नाही. आता आपण गप्प बसावे, रिटायरमेन्ट मिळालेली आहे, आता घरी बसा, अशा शब्दांत नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांना सुनावलंय. स्वतःच्या कर्तृत्वावर संरपंच होण्याची सुद्ध तुमची लायकी नाही, असंही ते म्हणालेत. बाळासाहेब ठाकरेंच्या नावामुळे तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं, असंही त्यांनी म्हटलंय.

Published on: Aug 31, 2022 05:52 PM
Eknath Shinde : ‘सुरुवात कुणी विसरता कामा नये, माझी सुरुवात….’ किसन नगर 3 मध्ये बाप्पाची पूजा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,..
‘टीव टीव करत एक उंदीर फिरतोय महाराष्ट्रभर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने!’ नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला