उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ ‘हम दो हमारे दो’ राहणार, कुणी केला दावा?
VIDEO | जशा निवडणुका जवळ येतील तशी उद्धव ठाकरे गटातील सगळी लोकं घर वापसी करणार, शिवसेनेच्या खासदारानं केला मोठा दावा...
बुलढाणा : काही खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात आहे, असे शिवसेनेकडून सांगितले जात असताना यावर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी भाष्य केले आहे. ‘काल रत्नागिरीच्या खेड येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की, उद्धव ठाकरे यांनी नारा दिला होता, माझे कुटुंब माझे जबाबदारी आणि काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हम दो हमारे दो एवढे शिवसेनेमध्ये राहतील बाकीचे सगळे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, असे म्हणत ठाकरे गटातील नेत्यांबाबत प्रतापराव जाधव यांनी मोठा दावा केला आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये आता लोक राहणार नाही. आता जे आहेत त्यांच्या काही स्थानिक अडचणी आहे म्हणून ते थांबलेले आहेत. जस-जशा निवडणुका जवळ येतील तशी ही सगळी लोकं घर वापसी करतील आणि या शिवसेनेमध्ये ते पुन्हा येतील आणि निवडणुका लढतील, असेही खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.