भाजप सत्तेत म्हणून त्यांना फ्री हीट अन् आमची हीट विकेट काढायची, उद्धव ठाकरे यांचा रोख नेमका कुणावर?

| Updated on: Nov 16, 2023 | 3:00 PM

भाजप सत्तेवर आहे म्हणून त्यांना फ्री हीट द्यायची आणि आमची हिट विकेट काढायची. याला मोकळ्या वातावरणातील निवडणुका म्हणता येत नाही, क्रिकेटमध्ये जसे नियम असतात तशीच निवडणुकीत आचारसंहिता असते. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. त्यात काही शंकांचा खुलासा विचारला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३ | निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी काही शंका उपस्थित करून त्यावर निवडणूक आयोगाला खुलासा करण्यास सांगितले आहे. भाजप सत्तेवर आहे म्हणून त्यांना फ्री हीट द्यायची आणि आमची हिट विकेट काढायची. याला मोकळ्या वातावरणातील निवडणुका म्हणता येत नाही, क्रिकेटमध्ये जसे नियम असतात तशीच निवडणुकीच्या काळातही आचारसंहिता असते. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. त्यात काही शंकांचा खुलासा विचारला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तर 1987 मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली असल्याचे म्हणत देशात पहिल्यांदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि ती आम्ही जिंकली. नंतर आमच्यासोबत भाजप आला. मात्र यामध्ये धक्कादायक म्हणजे, हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून सहा वर्षासाठी आमचा मतदानाचा अधिकारही काढून घेतला होता. गर्व से कहो हा नारा विश्व हिंदू परिषदेने दिला असेल पण शिवसेना प्रमुखांनी ते नारा बुलंद केला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Published on: Nov 16, 2023 03:00 PM
Nana Patekar Slaps Fan : व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडिओवर नाना पाटेकर यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, मी स्वतः माफी…
जय भवानी-जय शिवाजी, जय श्रीराम, हर हर महादेव म्हणत आम्हाला मत द्या, उद्धव ठाकरेंनी का केलं असं आवाहन?