ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जागून दाखवा; उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आव्हान

| Updated on: Jun 24, 2022 | 3:48 PM

"ज्या बाळासाहेबांनी आणि शिवसेनेनं तुम्हाला दिलं आज तुम्ही त्यांच्यासोबत गद्दारी करत आहात. ठाकरे आणि शिवसेना नाव न घेता तुम्ही जगून दाखवा," असं थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता दिलं आहे.

“ज्या बाळासाहेबांनी आणि शिवसेनेनं तुम्हाला दिलं आज तुम्ही त्यांच्यासोबत गद्दारी करत आहात. ठाकरे आणि शिवसेना नाव न घेता तुम्ही जगून दाखवा,” असं थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता दिलं आहे. “ज्यांनी मातोश्रीवर आणि माझ्या कुटुंबीयांवर घाणेरडे आरोप केले, त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही. मी शांत आहे पण षंढ नाही. ज्यांची स्वप्नं होती ती आपण आजवर पूर्ण केली. पण आणखी काही स्वप्न असतील तर त्यांनी जावं. सेनेची मूळं आज माझ्यासोबत आहेत. झाडाच्या फांद्या, फुलं, फळं न्या… पण तुम्ही मूळं नेऊ शकत नाही”, असं ते म्हणाले. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे.

“सरकार कुठलंही येऊ द्या मात्र..”, शिवसेनेच्या बंडाळीवर काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं – उद्धव ठाकरे