‘NCB ला अजून मोठा होमवर्क करावा लागेल’, सरकारी वकील Ujjwal Nikam यांनी मांडला केस संदर्भातील आढावा
आर्यन खानला (Aryan Khan) गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आता त्याच्या सुटकेची प्रक्रिया आज म्हणजेच शुक्रवारी (29 ऑक्टोबर) सायंकाळपासून सुरू आहे.
क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयात जवळपास तीन दिवस दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय घेतलाय. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना वकील उज्ज्वल निकम यांनी ‘NCB ला अजून मोठा होमवर्क करावा लागेल’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.