Ujjwal Nikam | राजकीय नेत्यांच्या शिवराळ भाषेवर उज्ज्वल निकम यांचं मिश्किल भाष्य
पिंपरी-चिंचवड मध्ये डॉ. अमरसिंह निकम लिखित अ होमिओपॅथिक गाईड टू कोविड 19 या पुस्तकाचे प्रकाशन सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये राजकारणी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत, आग ओकत आहेत, अशा स्थितीमध्ये होमिओपॅथीच्या अशा गोळ्या तयार करण्याची गरज आहे, ज्या गोळ्या खाऊन राजकारण्यांच्या तोंडून शिवराळ भाषा येणार नाही आणि श्रोत्यांना देखील ऐकायला आवडेल, अशी मिश्किल टिप्पणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली. पिंपरी-चिंचवड मध्ये डॉ. अमरसिंह निकम लिखित अ होमिओपॅथिक गाईड टू कोविड 19 या पुस्तकाचे प्रकाशन सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सध्या पोलिसांच्या कार्यपद्धती वर नाराजी व्यक्त करताना चांगले अधिकारी पाहिल्यानंतर समाधान वाटते अशी भावना व्यक्त केली