पुतिन हे 21 व्या शतकातील हिटलर, यूक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्याचं वक्तव्य
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. व्लादिमीर पुतिन हे 21 व्या शतकातील हिटलर आहेत, असं वक्तव्य युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलं आहे. रशियासोबत जो व्यापार करेल तो युद्ध गुन्हा करेल, असं यूक्रेननं म्हटलं आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. व्लादिमीर पुतिन हे 21 व्या शतकातील हिटलर आहेत, असं वक्तव्य युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलं आहे. रशियासोबत जो व्यापार करेल तो युद्ध गुन्हा करेल, असं यूक्रेननं म्हटलं आहे. दरम्यान यूक्रेन आणि रशिया यांच्यात बेलारुसमध्ये चर्चेला सुरुवात झालीय. आज होत असलेल्या चर्चेतून काय मार्ग निघतो, हे पाहावं लागणार आहे. दुसरीकडे चर्चा सुरु असली तरी, यूक्रेनवरील हल्ले थांबवले जाणार नाहीत, असं रशियानं म्हटलंय. तर, यूक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्सकी यांनी रशियाच्या सैन्याला परत जाण्याचं आवाहन केलं आहे.