युक्रेनचे रशियाला चोख प्रत्युत्तर, रशियन सैन्याच्या ताफ्यावर हल्ला

| Updated on: Mar 02, 2022 | 9:46 AM

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता युद्धात युक्रेन देखील मागे राहिले नाही. युक्रेन देखील रशियाला चोख प्रत्युत्तर देत असल्याचे पहायला मिळत आहे. युक्रेनच्या एका शहरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या रशियन सैन्याच्या ताफ्यावर युक्रेन सैनिकांनी हल्ला केला आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता युद्धात युक्रेन देखील मागे राहिले नाही. युक्रेन देखील रशियाला चोख प्रत्युत्तर देत असल्याचे पहायला मिळत आहे. युक्रेनच्या एका शहरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या रशियन सैन्याच्या ताफ्यावर युक्रेन सैनिकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात रशियाचे अनेक सैनिक गंभीर जखमी झाल्यचे वृत्त समोर येत आहे. रशियाकडून युक्रेनच्या कीव आणि खारिकव या दोन शहरांना लक्ष करण्यात येत आहे.

रशियाकडून युक्रेनमध्ये तुफान गोळीबार, दृश्य कॅमेऱ्यात कैद
रशियन विमान उड्डाणासाठी अमेरिकन हवाई क्षेत्र बंद – बायडन