Ukraine Russia War चा India वर परिणाम होणार - Bhagwat Karad

Ukraine Russia War चा India वर परिणाम होणार – Bhagwat Karad

| Updated on: Feb 27, 2022 | 7:16 PM

शात आत्ताच महागाईचा भडका उडाल्याने महागाई कशी कमी करावी? याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. अशात केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीयांच्या खिशावर आणखी भार पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

नाशिक : रशिया-युक्रेन युद्धाने (Russia Ukraine War) सध्या जगाला धडकी भरवली आहे. कारण जगभरातील लोक सध्या या देशात अडकले आहेत. प्रत्येक देश त्यांच्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहे. या युद्धाचा इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम कमी अधिक प्रमाणात होणार आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आधीच वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Price) किमतींनी भारतीयांच्या खिशाला मोठी कात्री लावली आहे. हेच पेट्रोल-डिझेलचे दर आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या युद्धाने भारतीयांचीही मोठी चिंता वाढवली आहे. देशात आत्ताच महागाईचा भडका उडाल्याने महागाई कशी कमी करावी? याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. अशात केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीयांच्या खिशावर आणखी भार पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

3 तास Russia चं शिष्टमंडळ Ukraine ची वाट पाहणार – Russia Ukraine War
बीडमध्ये दुचाकीच्या शोरुमला भीषण आग, अनेक गाड्या जळून खाक