युरोपीय युनियनमध्ये सदस्य होण्यासाठी Ukraine चा अर्ज – Russia Ukraine War

| Updated on: Mar 01, 2022 | 8:02 PM

रशिया (Russia) आणि यूक्रेनमध्ये (Ukraine) सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर यूक्रेन आता यूरोपियन यूनियनचा (European Union) सदस्य बनणार आहे. यूक्रेनला सदस्य बनण्याची प्रक्रिया सुरु झालीय. यूरोपियन यूनियनमध्ये सहभागी होण्यासाठी यूक्रेननं केलेला अर्ज यूरोपियन संसदेनं (European Parliament) स्वीकारला आहे.

रशिया (Russia) आणि यूक्रेनमध्ये (Ukraine) सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर यूक्रेन आता यूरोपियन यूनियनचा (European Union) सदस्य बनणार आहे. यूक्रेनला सदस्य बनण्याची प्रक्रिया सुरु झालीय. यूरोपियन यूनियनमध्ये सहभागी होण्यासाठी यूक्रेननं केलेला अर्ज यूरोपियन संसदेनं (European Parliament) स्वीकारला आहे. दरम्यान, यूक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर यूक्रेनचं मोठं नुकसान झालंय. रशियाकडून यूक्रेनच्या अनेक शहरांवर सातत्याने बॉम्ब वर्षाव सुरु आहे. कीवसह देशातील प्रमुख शहरांना रशियन सैन्याकडून निशाणा बनवलं जात आहे. यूक्रेनमधील दुसरं सर्वात मोठं शहर खार्किववर रशियन सैन्य आणि यूक्रेनी सैन्यात जोरदार लढाई सुरु आहे. यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी यूरोपियन यूनियनमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर हा अर्ज यूरोपियन यूनियनने फ्रान्सचे स्थायी प्रतिनिधी लेग्लिस-कोस्टा यांना सोपवलं. जेलेन्स्की यांनी यूक्रेनी संसदेचे प्रमुख वेरखोव्ना राडा आणि पंतप्रधान दिमित्रो श्मीगल सोबत संयुक्तरित्या हस्ताक्षर केलं. राष्ट्रपती जेलेन्स्की म्हणाले, मी यूक्रेनच्या यूरोपियन यूनियनच्या सदस्यता अर्जावर हस्ताक्षर केलं. सोमवारी झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनलाही संबोधित केले.

Published on: Mar 01, 2022 07:40 PM
64 किलोमीटर लांब सैन्याच्या ताफ्याचा फोटो समोर – Russia Ukraine War
राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री Nitin Raut यांची मोठी घोषणा