युक्रेनचा तरुणवर्ग आता बॉम्बनिर्मितीसाठी युद्धभूमीवर
ग्णालये, विद्यापीठ, सामुहिक ठिकाणे, रेल्वे स्टेशन अशी ठिकाणांवर बॉम्ब हल्ले करुन युक्रेनमधील अनेक शहर उद्धवस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे युक्रेनचा तरुणवर्ग आता बॉम्बनिर्मितीसाठी युद्धभूमीवर उतरला आहे.
रशियाकडून क्षेपणास्त्रांचा मारा होत असल्याने युक्रेन मोठ्या संकटात सापडले आहे. रुग्णालये, विद्यापीठ, सामुहिक ठिकाणे, रेल्वे स्टेशन अशी ठिकाणांवर बॉम्ब हल्ले करुन युक्रेनमधील अनेक शहर उद्धवस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे युक्रेनचा तरुणवर्ग आता बॉम्बनिर्मितीसाठी युद्धभूमीवर उतरला आहे. युक्रेनमधील अनेक तरुण आता पेट्रोल बॉम्ब तयार करण्याचे काम करत आहेत. रशियाबरोबर युद्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणात बॉम्ब गोळे शहरांवरुन टाकण्यात येत आहेत. त्यासाठी रशियाबरोबर सामना करण्यासाठी म्हणून आता युक्रेनमधील तरुणवर्ग बॉम्ब निर्मिती करत आहे. रशियाकडून हल्ले सुरु झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीच झेलेंस्की यांनी युवकांना युद्धात सामील होण्याचे आवाहर केले होते. त्याला आता युवावर्गाकडून चांगले बळ मिळत आहे.