सत्तासंघर्षाच्या निकालावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले, ‘…तर लोकशाहीसाठी तो काळा दिवस ठरेल’

| Updated on: May 10, 2023 | 3:43 PM

VIDEO | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं वक्तव्य, बघा काय म्हणाले...

मुंबई : महाराष्ट्रच नाही तर, शिंदे-फडणवीस सरकारचं काय होतं? याकडे देशभरातल्या लोकांच्या नजरा लागल्या असताना  सत्तासंघर्षाचा हा निकाल उद्या लागणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अशातच घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी या राज्यातील सत्तासंघर्षावर मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या दोन दिवसात निकाल नाही लागला तर ते लोकशाहीसाठी काळा दिवस असेल. अक्षम्य गोष्ट सुप्रीम कोर्टकडून होईल. सरकार घटनाबाह्य आहे की नाही, हे दोन महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने ठरवायला हवं होतं. उध्दव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. दहाव्या सुचीनुसार 16 आमदार अपात्र व्हायलाच हवेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधीही राजीनामा देऊ शकतात. सुप्रीम कोर्ट अपत्रातेचा निर्णय घेणार नाही. ते विधासनभा अध्यक्षांकडे पाठवतील. सुप्रीम कोर्टाचा निकाल विधानसभा अध्यक्षावर बंधनकारक असेल. असं उल्हास बापट यांनी सांगितलं आहे. तर कायद्यानुसार आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार हा केवळ विधानसभा अध्यक्षांनाच असतो. पण त्यासाठी सुप्रीम कोर्ट काय नक्की नियम घालतं हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरेल. राज्यपाल बदलीचा किंवा निवडणूक आयोगाच्या निकालाचा उद्याचा निकालावर काहीही परिणाम होणार नाही, असंही बापटांनी सांगितलं आहे.

Published on: May 10, 2023 03:40 PM
मविआतील काही आमदार शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात, तर उरले सुरलेलंही राहणार नाहीत!; कोणाचा दावा?
‘शरद पवार यांनी भाकरी न फिरवताच अजित पवार यांची जिरवली’, कुणी केला हल्लाबोल