सत्तासंघर्षाची सुनावणी 7 सदस्यीय घटनापीठाकडे गेली तर निकाल किती लांबणार? काय म्हणताय घटनातज्ज्ञ उल्हास बापट?
VIDEO | सत्तासंघर्षाच्या सुनावणी ७ सदस्यांच्या घटनापीठाकडे जाणार? घटनातज्ज्ञ उल्हास बापट काय म्हणाले?
नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षावरून ही सुनावणी सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तसेच शिंदे गटाचे वकील हरिश साळवी आणि नीरज कौल यांच्या वतीने हा युक्तिवाद करण्यात आले. यापूर्वीच्या किहोटो आणि नबाम रेबिया खटल्यांचेही दाखले देण्यात आले. 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांचे अधिकार अधोरेखित करणारे दावे-प्रतिदावे पाच सदस्यीय घटनापीठासमोर करण्यात आले. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या खटल्याची सुनावणी आता सात सदस्यीय घटनापीठासमोर व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.सुप्रीम कोर्टाने यासंदर्भातील निकाल राखून ठेवला आहे. पण 7 सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी होणार असा निकाल दिल्यास सत्तासंघर्षाचा खटला आणखी किती काळ लांबेल, यावरून घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.