Ulhasnagar | बर्थडे सेलिब्रेशननिमित्त तलवारीने केक कापला, व्हिडीओ व्हायरल; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
समीर शेख आणि फौजी लबाना या दोघांनी तलवारीने केक कापला. याचा व्हिडीओ त्यांच्याच सोबतच्या काही तरुणांनी मोबाईलमध्ये चित्रित केला आणि तो व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत शोधाशोध सुरू केली. काही तासातच समीर शेख आणि फौजी लबाना या दोघांनाही उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
उल्हासनगरच्या कॅम्प 2 मधील आझाद नगर परिसरात राहणाऱ्या समीर शेख याचा बुधवारी वाढदिवस होता. यानिमित्ताने बुधवारी रात्री तरुणांच्या गर्दीत आझाद नगर परिसरात बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी समीर शेख आणि फौजी लबाना या दोघांनी तलवारीने केक कापला. याचा व्हिडीओ त्यांच्याच सोबतच्या काही तरुणांनी मोबाईलमध्ये चित्रित केला आणि तो व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत शोधाशोध सुरू केली. काही तासातच समीर शेख आणि फौजी लबाना या दोघांनाही उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून केक कापण्यासाठी वापरण्यात आलेली तलवार आणि एक छोटा चाकू हस्तगत करण्यात आला. अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी उन्माद घालत शस्त्रांचा वापर केल्याबद्दल त्यांच्यावर जमावबंदी, पॅन्डेमिक ऍक्ट यासह हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.