मनोज जरांगे यांचं पुन्हा उपोषण अन् मुख्यमंत्री दिल्लीत, आरक्षणासंदर्भात काय घडताय घडामोडी?

| Updated on: Oct 25, 2023 | 10:56 PM

tv9 Marathi Special Report | कुणबी दाखल्यांसाठी, जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवरायांची शपथ घेत आरक्षणाचा पुन्हा शब्द दिला. मात्र अधिक वेळ देण्यास जरांगेंनी नकार दिला. ४० दिवसांचा अल्टिमेटम संपला जरांगे यांचं पुन्हा आमरण उपोषण सुरू

मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३ | कुणबी दाखल्यांसाठी, जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत आरक्षणाचा पुन्हा शब्द दिला. मात्र अधिक वेळ देण्यास जरांगेंनी नकार दिला. तर इकडे मुख्यमंत्री तडकाफडकी दिल्लीत गेल्याचे पाहायला मिळाले. तर आमरण उपोषण सुरु करतानाच जरांगेंनी मराठ्यांना आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण रोखतंय, असा सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यातून शिवरायांची शपथ घेतली आणि इकडे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले. त्यामुळं अचानक शिंदे फडणवीस दिल्लीला का आले ? मराठा आरक्षणावर काही ठरणार आहे का ? हा प्रश्न आहे. तर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य आणि मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन आणखी भुवया उंचावल्यात. 24 तासांत काही तरी जादूची कांडी फिरणार असेल म्हणूनच शिंदेंनी छत्रपतींची शपथ घेतली असावी असं सुळे म्हणाल्या. बघा नेमक्या काय घडताय घडामोडी?

Published on: Oct 25, 2023 10:56 PM
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्त होणार? काय केली मोठी घोषणा?
‘अंधेरी नाक्यावरचे भिकारी…’, ‘प्रेतावरचं टाळू खाण्याचा…’, ठाकरे गटाच्या खासदाराची शिंदे गटावर टीका