शेतकऱ्यांना समर्पित असा केंद्रीय अर्थसंकल्प | Devendra Fadnavis | Union Budget 2022 |

| Updated on: Feb 01, 2022 | 3:58 PM

Union Budget 2022-23 : केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपने केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. तर विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.

Union Budget 2022-23 : केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपने केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. तर विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना समर्पित असा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. फडणवीसांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, “भारताला आत्मनिर्भर (Atmanirbhar Bharat) आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे.सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे खूप खूप आभार!”

Published on: Feb 01, 2022 03:14 PM
Budget 2022 | अर्थसंकल्पात नेमकं काय स्वस्त झालं आहे?
विद्यार्थ्यांना भडकवल्याप्रकरणी Hindustani Bhau ला 3 दिवस कोठडी