Budget 2023 : भारतीय रेल्वे होणार सुफरफास्ट, काय केली निर्मला सीतारामण यांनी घोषणा?
भारतीय रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज त्यांचा पाचवा अर्थसंकल्प सादर करत आहे. यावेळी त्यांनी भारतीय रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद केली असल्याची मोठी घोषणा केली आहे. भारतीय रेल्वेला 2.4 लाख कोटी रूपये दिल्याने भारतीय रेल्वे आता अधिक सुपरफास्ट होणार आहे. तसेच भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 75 हजार नवी नोकर भरती करण्यात येणार आहे. सीतारामण यांनी आज संसदेत 2023-2024 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक दिलासा देणाऱ्या घोषणा केल्यात. यासह रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रूपये दिले जाणार आहेत. तसेच ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती देखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे.
Published on: Feb 01, 2023 12:56 PM