Union Budget 2024 : रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सातवा अर्थसंकल्प सादर करत आहेत. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली असून रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठी सरकारने अधिकची तरतूद केली आहे. रोजगार आणि कौशल्यविकासाशी संबंधित 5 योजनांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज सातवा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामन यांनी मोठ मोठ्या घोषणा केल्या आहेत. महिला, तरुण, गरीब आणि बळीराजा यांच्यासंदर्भात या बजेटमध्ये अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली असून रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठी सरकारने अधिकची तरतूद केली आहे. रोजगार आणि कौशल्यविकासाशी संबंधित 5 योजनांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, रोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यात येत आहे. या योजनांतून 4.1 कोटी लोकांना रोजगार आणि कौशल्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत 5 वर्षासाठी वाढवण्यात आली आहे, अशी माहितीही निर्मला सीतारामन यांनी केली आहे.