हे नाकारता येणार नाही, राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर भागवत कराड यांची प्रतिक्रिया
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर मंत्री केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची प्रतिक्रिया, बघा व्हिडीओ
औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशातच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यांना राज्यपाल होण्यापूर्वीपासून ओळखतो, त्याचा कामाचा अनुभव चांगल आहे. त्यांचा स्वभाव चांगला आहे, मात्र त्यांची कारकिर्द फार वादग्रस्त ठरली हे नाकारता येणार नाही. आज राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाला आणि महाराष्ट्रात नवे राज्यपाल येतायत त्यांचं मी स्वागत करतो. महाराष्ट्र हे प्रगतशील राष्ट्र असल्याने त्यांची कारकीर्द चांगली जाईल, त्यासाठी शुभेच्छा देतो, असेही भागवत कराड यांनी सांगितले.
Published on: Feb 12, 2023 02:54 PM