अमित शाहांनी आपल्या पत्नीसह घेतले लालबागच्या राज्याचे आशीर्वाद

| Updated on: Sep 09, 2024 | 12:46 PM

मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी लालबागचा राजा अशी ख्याती असलेला लालबागच्या राजाचं दर्शन व्हावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक राज्यभरातून तर काही परदेशातूनही येत असतात. यामध्ये राजकीय नेते मंडळीही दाखल होत असतात. आज शरद पवार यांनी दर्शन घेतल्यानंतर अमित शाह देखील राजाच्या चरणी लीन झालेत

Follow us on

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहेत. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांनी त्यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या गणरायांचं दर्शन घेतलं. अमित शाह दरवर्षी ‘लालबागचा राजा’च्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मुंबईत सहकुटुंब दाखल होत असतात. त्याच प्रकारे यंदाही अमित शाह यांचा दौरा होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा फार महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी हा अमित शाह यांचा तिसरा दौरा आहे. अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असून दौऱ्यानिमित्त मुंबईत दाखल झालेल्या अमित शाह यांनी आज सोमवारी ९ सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नीदेखील लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारही उपस्थित होते.