VIDEO : Nagar Fire | नगर रुग्णालय दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून शोक व्यक्त
अहमदनगर शहरातील सरकारी रुग्णालयाला आग लागून 10 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ही आग लागली. नगर रुग्णालय दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे.
अहमदनगर शहरातील सरकारी रुग्णालयाला आग लागून 10 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ही आग लागली. नगर रुग्णालय दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. शॉटसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या घटनेने नगर शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आगीची घटना मनाला व्यथित करणारी असल्याचं म्हटलं आहे. तर, या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.