मेधा कुलकर्णी यांच्या फेसबूक पोस्टमधून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा अन् चंद्रकांत दादांचं मौन!

| Updated on: Aug 12, 2023 | 11:34 PM

VIDEO | भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची फेसबुकवर जाहीर नाराजी अन् नाराजी दूर करण्यासाठी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मेधाताईंच्या घरी... मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीची नितीन गडकरी यांनी घेतली दखल

मुंबई, १२ ऑगस्ट २०२३ | पुण्यातील चांदणी चौक या पुलाचं आज लोकार्पण झालं. मात्र त्याआधी मेधा कुलकर्णी यांनी चंद्रकांत पाटील यांचं नाव न घेता टीका केली होती. मात्र आज दोघेही एकावेळी कार्यक्रमाला हजर राहिले होते मात्र चंद्रकांत पाटील यांनी न बोलणंच पसंत केलं. चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या परिपत्रक पाहिल्यानंतर पुण्यात भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ही फेसबूक पोस्ट चांगलीच चर्चेत आली. या पोस्टमधून पुणे कोथरूडचे सध्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा होता. मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमात मेधा कुलकर्णी यांना स्टेजवर स्थान देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात आली आणि कार्यक्रम संपल्यानंतर स्वतः नितीन गडकरी मेधा कुलकर्णी यांच्या घरी आले. तर गडकरी यांच्याद्वारे मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यात आल्याची माहिती मिळतेय. बघा काय म्हणाले यावेळी नितीन गडकरी आणि मेधा कुलकर्णी यांची प्रतिक्रिया काय होती.

Published on: Aug 12, 2023 11:34 PM
मुलाकात हुई, क्या बात हुई? बंडानंतर अजित पवार यांची पहिल्यांदाच शरद पवार यांच्यासोबत गुप्त बैठक
‘त्यांची शेवटची टर्म, त्यांना पुन्हा विधानभवनात जायला पुन्हा संधी नाही’; शिंदे गटातील नेत्यांवर शिवसेना नेत्याची टीका