राज्यात दोन नकली आणि एक अर्धा उरलेला पक्ष, अमित शाह यांचा ठाकरे-शरद पवारांवर निशाणा

| Updated on: Apr 12, 2024 | 12:37 PM

दहा वर्ष सत्तेत असताना सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग सरकारचे तुम्ही कर्ता-धर्ता होतात, शरद पवार तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय दिलं? असा सवालही अमित शाह यांनी शरद पवारांना केलाय. शरद पवार महाराष्ट्राचा विकास करू शकले नाही, असंही म्हणत अमित शाह यांची टीका काय?

राज्यात दोन नकली पक्ष एक म्हणजे राष्ट्रवादी आणि दुसरं शिवसेना, असं वक्तव्य करत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. इतकंच नाहीतर दहा वर्ष सत्तेत असताना सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग सरकारचे तुम्ही कर्ता-धर्ता होतात, शरद पवार तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय दिलं? असा सवालही अमित शाह यांनी शरद पवारांना केलाय. शरद पवार महाराष्ट्राचा विकास करू शकले नाही, असंही म्हणत अमित शाह यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी नांदेडकरांना काँग्रेसकडे हिशोब मागायला हवा की नाही? असा सवालही केला. पुढे इंडिया आघाडीबद्दल बोलताना अमित शाह असेही म्हणाले की, महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यात १ नकली शिवसेना, १ नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस पार्टी…आहे.

Published on: Apr 12, 2024 12:37 PM
महायुतीच्या प्रचारात आता राज ठाकरे, सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकात झळकला फोटो
फक्त घराबाहेर पड… कपडे फाडून मारु, मनसेच्या प्रशांत गीड्डे यांचा उबाठा नेत्याला इशारा