WITT Global Summit : खेलो इंडियाची जादू ऑलिम्पिकमध्ये अन् भारतच वर्चस्व गाजवणार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा विश्वास

| Updated on: Feb 25, 2024 | 6:45 PM

व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीटमध्ये गियरिंग अप फॉर स्पोर्ट्स असेन्डन्सी या परिसंवादात केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भाग घेतला होता. यावेळी अनुराग ठाकूर यांनी देशातील स्पोर्ट्स रिव्होल्यूशनवर चर्चा केली. यावेळीही खेलो इंडियाची जादू ऑलिम्पिकमध्ये दिसेल असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीटमध्ये गियरिंग अप फॉर स्पोर्ट्स असेन्डन्सी या परिसंवादात केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भाग घेतला होता. यावेळी अनुराग ठाकूर यांनी देशातील स्पोर्ट्स रिव्होल्यूशनवर चर्चा केली. ते म्हणाले, आजचा भारत आपली उत्कृष्ट कामगिरी करत आहे आणि त्याचे फळ आपोआप समोर येत आहेत. खेलो इंडियासह अशा अनेक योजना आज सरकार चालवत आहेत. जिथे खेळाडूंसाठी सर्व व्यवस्था केली जात आहे आणि त्याचे परिणामही पाहायला मिळत आहेत. आज सरकारने एक हजारांहून अधिक स्पोर्टस सेंटर बांधली असून ही केवळ सुरुवात आहे. राज्य सरकारकडून मदत मिळाल्यास आपण मोठी झेप घेऊ शकतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले. तर गेल्या ऑलिम्पिकवेळी कोरोना महामारीत आपण खेळाडू तयार केले. यापूर्वीही आपण खेळाडूंना विदेशात ट्रेनिंग दिलं. मीराबाई चानू दुखापतग्रस्त झाल्या होत्या. त्यांचा उपचार अमेरिकेत करण्यात आला. त्यानंतर त्यांनी मेडलही जिंकलं होतं. केवळ टोक्यो ऑलिम्पिकमध्येच नाही तर पॅरा ऑलिम्पिकमध्येही आपल्या खेळाडूंनी इतिहास रचला आहे. यावेळीही खेलो इंडियाची जादू ऑलिम्पिकमध्ये दिसेल असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.

Published on: Feb 25, 2024 06:45 PM
‘जरांगेंच्या आजच्या आरोपांनी त्यांचा खरा…,’ काय म्हणाले भातखळकर
WITT Global Summit : अनुराग ठाकूर स्पष्टच म्हणाले, 70 वर्षांचा भ्रष्टाचार हद्दपार करायला वेळ लागेल पण गर्वानं सांगतो…