Nashik | केंद्रीय मंत्री भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रा वादात
Bharti Pawar | जन आशीर्वाद यात्रा आयोजक भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाला गुन्हा दाखल. तर केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी आपण कोरोनाचे नियम पाळूनच यात्रा केल्याचा केला दावा.
केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा वादाच्या भोवऱ्यात. पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही काढण्यात आली यात्रा. यात्रेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर. सर्वच कोरोना नियम बसवले धाब्यावर. जन आशीर्वाद यात्रा आयोजक भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाला गुन्हा दाखल. तर केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी आपण कोरोनाचे नियम पाळूनच यात्रा केल्याचा केला दावा. जनतेच्या प्रश्नासाठीच आपण इथंपर्यंत आलोय. त्यामुळे नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी आम्ही घेतली होती, असे भारती पवार यांनी सांगितले.