Narayan Rane Arrest : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, रत्नागिरी पोलिसांकडून अटक

| Updated on: Aug 24, 2021 | 3:54 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता.

रत्नागिरी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. अखेर पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वर येथून नारायण राणे यांना अटक केली. त्याआधी नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळल्याने नारायण राणे यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नारायण राणे यांना अटक करुन संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. त्यापूर्वी नारायण राणे यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

Published on: Aug 24, 2021 03:30 PM
VIDEO : Narayan Rane Live | नारायण राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं-सूत्र
Narayan Rane Arrest | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक