Breaking | केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकण दौऱ्यावर जाणार
केंद्रीय मंत्री नारायण राणे 26 ऑगस्टला सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणार आहेत. आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ते सिंधुदुर्गचा दौरा करणार आहेत. राणे यांना मुंबई ते सिंधुदुर्ग असा झंझावाती दौरा असणार आहे. 24 ऑगस्टला राणे रायगड, तर 25 ऑगस्टला रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे 26 ऑगस्टला सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणार आहेत. आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ते सिंधुदुर्गचा दौरा करणार आहेत. राणे यांना मुंबई ते सिंधुदुर्ग असा झंझावाती दौरा असणार आहे. 24 ऑगस्टला राणे रायगड, तर 25 ऑगस्टला रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यापूर्वी महापुरानं कोकणात हाहा:कार माजवल्यानंतर नारायण राणे रायगड आणि चिपळूणच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आता राणे महिनाभरात कोकणाचा दुसरा दौरा करणार आहेत. त्यामुळे राणे यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असणार आहे.