Ratnagiri | शिवसेना आमदार राजन साळवींनी फाडले नारायण राणेंचे पोस्टर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना अटक केले आहे. दुसरीकडे शिवसैनिकांनी राज्यभर आंदोलनं करत राणेंचे पोस्टर देखील फाडले आहेत.
भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले आहेत. युवा सेनेचे नेते वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे रत्नागिरी येथे शिवसेना आमदार राजन साळवींनी फाडले नारायण राणेंचे पोस्टर फाडले.
दुसरीकडे मुंबईत भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडी सरकार कशाप्रकारे दडपशाही करत आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना प्रोटोकॉल न पाळता अटक करण्यात येत आहे, असा आरोप भाजप नेते करत आहेत. तसंच नारायण राणे यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांची शुगर लेवल आणि ईसीजी करता आला नाही, असं वैद्यकीय पथकानं म्हटलंय. त्यामुळे राणे यांची वैद्यकीय तपासणीतही अडथळे आणण्यात आल्याचा आरोप भाजपनं केलाय