मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणात मोठी अपडेट, नागपूर पोलीस आता करणार…

| Updated on: Apr 19, 2023 | 1:07 PM

VIDEO | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणी नागपूर पोलीस करणार बेळगाव कारागृहात बंद असलेल्या 'या' दहशतवाद्यांची चौकशी

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गेल्या काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. या धमकी प्रकरणात एक अपडेट समोर आली आहे. दहशतवादी अकबर पाशाच्या सांगण्यावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देण्यात आली होती. धमकी देणारा आरोपी जयेश पुजारी याच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती पुढे आलीय. आता नागपूर पोलीस बेळगाव कारागृहात बंद असलेल्या अकबर पाशा सह त्याच्या इतर दहशतवादी साथीदारांची चौकशी करणार आहे. यासाठी नागपूर पोलीसांच्या तीन स्पेशल टीम गठीत करण्यात आल्या असून या तिन्ही टीम बेळगाव, मेंगलुर आणि बंगलुरु येथे जाऊन चौकशी करणार आहे. बेळगाव तुरुंगात बंद असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरूनच नितीन गडकरींना धमकी दिल्याची बाब पुढे आलीय. अकबर पाशा हा प्रतिबंधित पीएफआय संघटनेचा सदस्य आहे. आरोपी जयेश पुजारी PFI सह लष्कर ए तोयबा आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांशी संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Published on: Apr 19, 2023 01:07 PM
जे मृत्यू झाले ते दुसऱ्या आजाराने; कोरोना मृत्यवर महाजन यांचे स्पष्टीकरण
मी माझ्या पत्नीला राज्याची पहिली मुख्यमंत्री करणारच; अभिजीत बिचुकले यांचा निर्धार