Nitin Gadkari |… तर राष्ट्रीय महामार्गांबद्दल वेगळा विचार करावा लागेल, नितीन गडकरींचा ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर लेटर बॉम्ब टाकला आहे. वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेते, कार्यकर्ते यांच्याकडून दबाव आणला जात असल्यानं राष्ट्रीय महामार्गाची कामं बंद करावी लागतील, असा इशारा गडकरी यांनी दिला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर लेटर बॉम्ब टाकला आहे. वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेते, कार्यकर्ते यांच्याकडून दबाव आणला जात असल्यानं राष्ट्रीय महामार्गाची कामं बंद करावी लागतील, असा इशारा गडकरी यांनी दिला आहे. नितीन गडकरींच्या कार्यालयाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिण्यात आलं आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय रस्ते विकासाची कामं रखडली आहेत. मी माहिती घेतल्यावर स्थानिक शिवसेना प्रतिनिधींनी ही काम थांबवली असल्याचं मला कळलं, असंही गडकरी यांनी पत्रात म्हटलं आहे. तसंच स्थानिक नेत्यांचे जर असेच प्रकार सुरु राहिले तर महाराष्ट्रात रस्त्यांच्या कामांना नविन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा गडकरींनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
शिवसेना नेते आणि वाशिम पालकमंत्री गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याविषयी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली आहे. वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री असून गेल्या दिड ते दोन वर्षात अशा प्रकारची तक्रार आलेली नाही. वाशिमला जात असून सीएमओकडून पत्राबाबत माहिती घेईन, असं शंभूराज देसाई म्हणाले.