रामदास आठवले यांची शरद पवार यांना खुली ऑफर, देशाचं राजकारण बदलणार?

| Updated on: Mar 26, 2023 | 5:52 PM

VIDEO | रामदास आठवले यांनी शरद पवार यांना दिलेली 'ही' मोठी ऑफर शरद पवार स्वीकारणार का?

सांगली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय प्रश्नांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांना थेट एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली. शरद पवारांनी आता एनडीएसोबत यावे. नागालँडप्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी एनडीए सोबत यावे. मात्र रामदास आठवले यांनी शरद पवार यांना मोठी ऑफर दिल्यानंतर शरद पवार आठवले यांची ही ऑफर स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच रामदास आठवले यांनी दिलेल्या खुल्या ऑफरवरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान,  शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. मोदींकडून पवारांचें अनेक वेळा कौतुक झाले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं रामदास आठवले म्हणाले.

Published on: Mar 26, 2023 05:51 PM
‘राज ठाकरे गर्दी जमवण्यात एक्सपर्ट’, कुणी लगावला खोचक टोला
‘भावी खासदार’ अविष्कार दादा भुसे, मालेगावातील ठाकरेंच्या सभेपूर्वी झळकले पोस्टर्स