WITT Global Summit : ‘माझं मदिनाला जाणं म्हणजे…’, बड्या कॉन्क्लेव्हमधून स्मृती इराणी यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Feb 26, 2024 | 4:43 PM

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी TV9 च्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' ग्लोबल समिटच्या नारी शक्ती विकसित भारत या सत्रात महिला शक्तीवर भाष्य केले आहेत. यासंदर्भात बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुकही केले.

Follow us on

नवी दिल्ली | 26 February 2024 : केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी TV9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिटच्या नारी शक्ती विकसित भारत या सत्रात महिला शक्तीवर भाष्य केले आहेत. यासंदर्भात बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुकही केले. इतकेच नाही तर स्मृती इराणी यांनी पीएम मोदींनी महिलांसाठी केलेल्या कामावर चर्चा केली. स्मृती इराणी नुकत्याच सौदी अरेबियातील मदिना दौऱ्यावर गेल्या होत्या. यासंबंधीच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, मुस्लिमांचे पवित्र ठिकाण असलेल्या मदिना येथे माझी भेट हा पंतप्रधानांना इस्लामिक देशांमध्ये स्वीकारल्याचा पुरावा आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगालच्या संदेशखाली प्रकरणावरही चर्चा केली. बघा व्हिडिओ