मोठी बातमी ! मनसे नेत्यावर मॉर्निंग वॉकवेळी लोखंडी रॉडनं हल्ला, हिंदुजा रुग्णालयात दाखल
शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना संदीप देशपांडे यांच्यावर काही हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावून लोखंडी रॉड आणि स्टम्पने केला हल्ला
दिनेश दुखंडे, मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना संदीप देशपांडे यांच्यावर काही हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावून लोखंडी रॉड आणि स्टम्पने हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, हे हल्लेखोर हल्ला केल्यानंतर तेथून पसार झाले. संदीप देशपांडे हे आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्कात आले होते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देशपांडे जखमी होऊन खाली कोसळले. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशपांडे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.