लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
कल्याण पश्चिमेत भाजप नेते हेमंत परांजपे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर आता शहरातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेंमत परांजपे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी हेंमत परांजपे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. इतकंच नाहीतर दगडाने देखील मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. तर दोन अज्ञात व्यक्तींकडून हेंमत परांजपे यांना करण्यात आलेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर आता शहरातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळत आहे. हेमंतर परांजपे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना 12 तासांत पकडा अन्यथा भाजप रसत्यावर उतरणार, असा इशाराच भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिला आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच दहशत पसरविण्याचा सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. हेमंत परांजपे यांनी सांगितला घटनेचा थरार – लिंकवर क्लिक करा