Maratha Reservation : अनोळखी फोन कॉलचा राजकीय नेत्यांनी घेतला धसका, काय आहे कारण?

| Updated on: Nov 03, 2023 | 11:43 AM

मराठा आरक्षणावरून अनेक लोकं नेत्यांना फोन लावताय आणि तोच संवाद नंतर चांगला व्हायरल होत आहे. अजित पवार गटातील नेत्यांमध्ये चक्क अनोळखी फोन कॉल उचलू नका, असा सूर उमटत आहे. आमदारांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत, खासदारांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकांना अनोळखी फोन

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३ | काय झाडी काय डोंगर यानंतर आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध नेत्यांचे फोन कॉल चांगलेच व्हायरल होताय. त्यामुळे अनोळखी फोन कॉल उचलू नये, अशा सूचना अजित पवार गटात दिल्या जातायंत. सध्या अनेक राजकीय नेत्यांनी मोबईल, फोन बेलचा धस्का घेतलाय. याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणावरून अनेक लोकं नेत्यांना फोन लावताय आणि फोनवरील तोच संवाद नंतर चांगला व्हायरल होतानाही पाहायला मिळत आहे. अजित पवार गटातील नेत्यांमध्ये चक्क अनोळखी फोन कॉल उचलू नका, असा सूर उमटत आहे. आमदारांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत, खासदारांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकांना लोकं फोन करून त्यांची भूमिका नेमकी काय म्हणून विचारणा करताय. तर यातील काही फोन कॉल वेगळ्या विषयावरून चर्चेत येत असून वादातही सापडताय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट..

Published on: Nov 03, 2023 11:43 AM
Maratha Reservation : मराठा आरक्षणावर मोदी सरकार तोडगा काढणार? आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार?
ललित पाटील ससूनमधून पसार झाल्यानंतर श्रीलंकेत जाणार होता पण… कोणता मोठा खुलासा आला समोर?