VIDEO : Satara | पर्यटनस्थळ असणाऱ्या महाबळेश्वर, पाचगणीत कडक निर्बंध, व्यापारी वर्गात नाराजी
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमधून महाबळेश्वर आणि पाचगणी देखील सुटू शकलेली नाहीय.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमधून महाबळेश्वर आणि पाचगणी देखील सुटू शकलेली नाहीय. गेले अनेक महिने लॉकडाऊनमध्ये घालवल्यानंतर व्यापाऱ्याचं जगणं मुश्किल झालं आहे. त्यात आता पुन्हा जिल्हाचा पॉझिटिव्हिटी दर पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध जैसे थे ठेवल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. साताऱ्याचा कोरोना संसर्ग दर वाढ पाहता जिल्हाधिकारी शेखर निकम यांनी जिल्ह्यासह पाचगणी महाबळेश्वर पर्यटन स्थळीही निर्बंध जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने जिल्ह्यातील व्यापारी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.