हातातोंडाशी आलेली द्राक्षे झोपली, द्राक्ष पंढरी नाशिकमध्ये अवकाळीने हाहा:कार

| Updated on: Nov 27, 2023 | 2:33 PM

रविवारी झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसला. यामुळे द्राक्ष पिकं आणि त्याच्या बागा भूईसपाट झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. किमान दीड ते दोन लाख रुपये मदत मिळावी, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

नाशिक, निफाड, २७ नोव्हेंबर २०२३ : द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्याला रविवारी संध्याकाळी गारपीठ आणि वादळी वाऱ्याच्या पावसानं चांगलंच झोडपलं आहे. रविवारी झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसला. यामुळे द्राक्ष पिकं आणि त्याच्या बागा भूईसपाट झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च येत असल्याने शासनाजवळ मिळणारी नुकसान भरपाईची मुदत तूटपुंजी असून किमान दीड ते दोन लाख रुपये इतकी मोठी मदत मिळावी अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत. यासह नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील ठेंगोडा गावात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कांदा, सिताफळ, वाल, शेवगा, तूर, मकई पिकाचे नुकसानही झाले आहे. आधीच्या पीकाचे अनुदान नाही, त्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवादिल झाला आहे.

Published on: Nov 27, 2023 02:33 PM
काही बड्या नेत्यांचा जालन्यात दंगल घडवण्याचा प्लॅन होता; शिवसेना नेत्याचा मोठा दावा
पुणे जिल्ह्यात अवकाळीचा कहर, काढणीला आलेलं ज्वारीचं पिक आडवं